राहुल गांधींना अयोध्येला नेणार का ? प्रश्नावर राऊतांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, 24 नोव्हेंबर रोजी ठरलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर पडला. त्यांनतर आज शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मात्र, त्यांच्या या दौऱ्याचं कोणीही राजकारण करु नये असं आवाहनदेखील राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील हजारो शिवसैनिक देखील अयोध्येला जाणार आहेत. ते अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतील, सोबतच शरयू तीरावर आरती करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जाणार का असा सवाल या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. सोबतच महाविका आघाडीच्या सर्व नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्येत यावं अशी इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींना आयोध्येत नेण्याबाबतच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाने ज्या मेहबूबा मुफ्तीसोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते, त्या मेहबूबा मुफ्तींना आयोध्या दौऱ्याच्या वेळी सोबत नेणार का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like