Sanjay Raut | संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Sanjay Raut | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथे युतीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात धुरळा उडाला आहे. ठाकरे यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर खा. संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केलाय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना याबद्दल विचारल असता त्यांनी संजय राऊत कधी महाविकास आघाडी २५ वर्षे टिकेल म्हणतात, कधी दुसर काही बोलतात. त्यामुळे ते पाणी पितात की अजून काही घेऊन बोलतात माहिती नाही, असा घणाघात राणे यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.

खा. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं.
मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली किंवा काय बोलले हे सर्व आतमध्ये आहे.
बाहेर कशाला सांगायचं, असं राऊत म्हणाले.

Web Title : Sanjay Raut | I don’t know what Sanjay Raut is talking about, Narayan Rane on sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update