Sanjay Raut | ED ने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मरेन, पण झुकणार नाही ! जय महाराष्ट्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने (ED) त्यांना ताब्यात घेतले. संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकासह पावणे पाचच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले ‘आप उस व्यक्ती को नही हरा सकते… जो कभी हार नही मानता ! झुकेंगे नही ! जय महाराष्ट्र’ असं ट्विट राऊतांनी केले आहे.

 

एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, जी कारवाई व्हायची होती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरु आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसैनिक (Shiv Sainik) यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.

 

संजय राऊत झुकणार नाहीत

ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सर्व सुरु आहे.
मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरे यांचा.
मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र (Maharashtra Shivsena) इतका कमजोर नाही आणि शिवसेनाही इतकी कमजोर नाही.
खरी शिवसेना काय आहे, हे आज तुम्ही पाहत आहे. मरेन पण संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही.

 

Web Title : –  Sanjay Raut | i will die but i will not bow down sanjay raut s first reaction after being detained by the ed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा