Sanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मागील काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) हल्ला चढवत आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही पत्र लिहिले होते. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सव्वा रुपयाचा दावा दाखल केला आहे. त्यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri, Pune) येथे संजय राऊत यांच्या उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

 

 

संजय राऊत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंपा चंपा अशा घोषणा दिल्या.
यावर राऊत म्हणाले, मी कशाला त्यांना चंपा म्हणू ? ते माझे चांगले राजकीय मित्र आहेत.
ते माजी म्हणू नका, असं म्हणत असतील तर भावी म्हणू. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे.
पण मी त्यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा लावला असून मी कोणताही दावा हरत नाही हे विसरु नका.
त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही. मी कोणताही खटला हरत नाही.
दोन वर्षापूर्वी तुम्हाला हरवून दाखवलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री (CM) करुन दाखवला आहे,
असे म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला.

 

पुण्याचा महापौर शिवसेना ठरवणार

पुण्यात आता शिवसेनेचे दहा नगरसेवक (Shivsena corporator) राहणार नाहीत
याची आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) आणि सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी काळजी घ्यावी.
त्यासाठीच उद्धवजींनी तुमच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर चांगलच आहे.
नाहीतर आपलं एकला चलो रे. पण पुण्याचा महापौर (Pune Mayor) शिवसेनाच ठरवणार असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

Web Title :-  Sanjay Raut | i will recover a quarter of a rupee shivsena mp sanjay raut on chandrakant patil in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Vijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो, पण…’, माजी मंत्री विजय शिवतारेंनी खंत व्यक्त करत दिला ‘हा’ इशारा (Video)

BJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे स्पष्टीकरण