Sanjay Raut | ‘…तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील’; जाणून घ्या संजय राऊत यांनी का केले असे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | शिवसेनेचे संजय पवार (Shivsena Sanjay Pawar) आणि भाजपाचे धनंजय महाडिक (BJP Dhananjay Mahadik) यांच्यातील राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पवार यांचा झालेला पराभव आणि त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष आमदारांबाबत (Independent MLA) केलेल्या वक्तव्यानंतर सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा नेते अनिल बोंडे (BJP Leader Anil Bonde) यांनी राऊतांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला, असे वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा संजय राऊत यांनी दमदार पलटवार केला आहे.

 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावेच जाहीर केली होती. यावर भाजपा नेते अनिल बोंडे यांनी राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे, राऊत यांना सत्तेचा माज आला आहे, त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला असे म्हटले. यावर आता राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

 

दोन दिवस ED आमच्या हातात द्या
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले की, आम्ही अपक्ष आमदारांबाबत आमच्या भावना व्यक्त केल्या.
यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही.
आम्हाला काय म्हणायचे आहे ते त्यांना समजले आहे आणि भाजपलाही माहिती आहे.
आमच्या हातात जर दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा शिवसेनेला मतदान करतील, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, आम्हाला सर्वकाही माहिती आहे. विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराजय झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असे होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सर्व वाहून गेले असे होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राज्यस्थानात काँग्रेस जिंकली आहे. हरियाणात रडीचा डाव खेळून निवडणूक आयोग आणि भाजपने अजय माकन यांचा पराभव केला आहे.

 

निवडणूक आयोगाला (Election Commission) हाताशी धरुन…

राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात येथील नेते काय करत होते ? ही सर्व माहिती आमच्याकडे आहे.
गृहखात्याला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते.
कुणाचे मत बाद करायचे यावर कशी चर्चा झाली. यंत्रणा आमच्याकडेही आहे फक्त ईडी नाही.
जर ईडी आमच्याकडे 48 तास दिली तर भाजप सुद्धा आम्हाला मतदान करेल.

 

Web Title :- Sanjay Raut | if we get ed in our hands then devendra fadnavis and bjp can vote for shiv sena said sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा