Sanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पती विरोधी पक्षनेता अन् पत्नी महापौर Mayor असा योगायोग असलेली जळगाव महानगरपालिका ( Jalgaon Municipal Corporation) ही देशातील पहिलीच महापालिका असेल. शिवसैनिकांनो सत्ता आली म्हणून माजू नका अन् सत्ता गेली म्हणून लाजू नका, जोरात काम केल तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. तसेच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जर खासदार निवडून आणण्याची जबाबदारी घेतली की ते पार पाडतात, अशा शब्दात राऊतानी पाटील यांचेही कौतुक केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Maratha reservation | ‘उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप’ – विनायक मेटे

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शनिवारी (दि. 12) जळगाव दौ-यावर होते. यावेळी राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव शिवसेनेची (Jalgaon Shiv Sena ) आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना अन् बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले हे आता महत्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा (Golden City) कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई महापालिकेनंतर आता उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे राज्य चालवत असल्याचे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  sanjay raut if we work hard shiv sena mp will be elected jalgaon

हे देखील वाचा

SBI | ‘या’ तारखेपर्यंत करा ‘आधार’ पॅन कार्डशी लिंक, अन्यथा बंद होतील महत्वाच्या सेवा

Pune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा