‘त्या’ वेळी अजितदादांच्या भाजपसोबत जाण्यामागे शरद पवारांचा हात नव्हता, संजय राऊतांचा मोठा ‘खुलासा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपविधी घेण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांनी जे केलं त्यामागे शरद पवारांचा हात नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे. नाशिकमधील एका प्रकट मुलाखतीत ते बोलत होते यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होणे म्हणजे काळानं घेतलला सूड आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “महाविकासआघाडीची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घेऊन खेळी केली. अजित पवारांचा शपथविधी हा अ‍ॅक्सिडेंटल शपथविधी होता. त्या रात्री राजभवन उघडं होतं. राज्यपाल झोपलेच नव्हते. भल्या पहाटे फडणवीसांनी गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचा मला धक्का बसला नाही. अजित पवार परत येतील ही माझी प्रतिक्रिया होती. अजित पवारांनी जे केलं त्यामागे शरद पवारांचा हात नव्हता.” असा खुलासाही त्यांनी केला.

पुढे बोलताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. फडणवीसांवर निशाणा साधत ते म्हणाले, “सरकारी यंत्रणा वापरून विरोधी पक्ष टिकू देणार नाही. ही आपल्या देशाची परंपरा नाही. मंत्रालय हे लोकांसाठी षडयंत्र करण्याचं कारस्थान करणारा अड्डा नाही. फडणवीस विरोधी पक्षनेते होणं हा काळानं घेतलेला सूड आहे.” असं म्हणत त्यांनी फडणवीसाना टोलाही लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like