‘राऊत साहेब, आता तुम्हीच शांत राहा, CBI न्याय करेल’, भाजपचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबियांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना तपासाला सहकार्य करावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्यानंतर आता भाजपकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता संजय राऊत यांनीच आता शांत रहावे, सीबीआय न्याय करेल, असा टोला भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शाहनावाझ हुसेन म्हणाले की, संजय राऊतजी, साहेब न्याय देता देता तुम्ही बराच उशीर केला. आता तुम्ही सांगता की, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय शांत राहिले तर न्याय मिळेल म्हणून. त्यापेक्षा आता तुम्हीच शांत रहा, सीबीआय न्याय करेल असे हुसेन यांनी म्हटले आहे.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. तसेच या प्रकरणावरून या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like