‘रास्ते की परवाह करुंगा तो मंजिल बुरा मान जाएगी’, शिवसेनेच्या नेत्याकडून भाजपाला ‘उत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जाहीर होण्याची वाट पहात असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘रास्ते की परवाह करुँगा तो मंजिल बुरा मान जाएगी’ वन्स अपॉन टाईम इन मुंबई या हिंदी चित्रपटातील हा संवाद ट्विट करुन भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

भाजपाने सरकार स्थापन करणार नसल्याची घोषणा करताना शिवसेनेला त्यांनी आता बारामती आणि दिल्लीचे आदेश घेण्याची सवय करावी, असा टोला लगावला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी हे ट्विट केले असून आता आपले मार्ग बदलले आहेत. मुख्यमंत्रीपदाची मंजिल गाठण्यासाठी कोणता रस्ता पकडायचा याचा विचार करत बसलो तर, ती मंजिल गाठणे अवघड होईल, असे त्यातून त्यांनी ध्वनित केले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like