Sanjay Raut | ‘द कश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या, संजय राऊतांचे मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटावरुन सुरु असलेला वादविवाद थांबायला तयार नाही. भाजपकडून (BJP) चित्रपटाचा प्रचार केला जात आहे तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) या सिनेमावरून भाजपवर निशाणा साधला आहे. या सिनेमातून गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला ते समोर आलं आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ सारखे चित्रपट यायला हवेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले होते. मात्र आज शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’ मधील अनेक घटना खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील (Sensitive) असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण (Politics) सुरु आहे. नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत, पण तो चित्रपट आहे. ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. परंतु काश्मीरी पंडितांसोबत (Kashmiri Pandits) शिखांनी सुद्धा बलिदान केले आहे. सुरक्षा दलातील मुस्लीम पोलिसांना (Muslim Police) देखील दहशतवाद्यांनी मारले आहे आणि काश्मीर पंडित सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते, असे राऊत यांनी म्हटले.

काश्मीर बाबत राजकारण होऊ नये
राऊत पुढे म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार ? काश्मीर मधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात ? काश्मीरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक (Investment) कधी करणार आहात ? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानला कधी जोडत आहात ? जे वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल.
राजकारण होते आणि राजकारण होऊ नये. काश्मीरच्या बाबतीत तरी हे राजकारण होऊ नये. राम मंदिराचा मुद्दा संपला असे आम्ही मानतो.

 

Web Title :- Sanjay Raut | many incidents in the kashmir files are false shiv sena leader and mp sanjay rauts big statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा