संजय राऊत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भेटल्याने खळबळ, चर्चेला उधाण ( व्हिडिओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते खासदार यांनी शुक्रवारी सकाळी नाशिक पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब सानप हे ५ वर्षे भाजपाचे आमदार होते. त्यांना नाशिक पूर्वमधून उमदेवारी नाकारल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळविले. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिक पूर्वमधून निवडणुक लढवत आहे. निवडणुकीच्या काळात ही भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक पूर्वमधून भाजपाचे राहुल ढिकळे निवडणुक लढवत आहेत. त्यांना लढत देत असलेले बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी आज सकाळीच शिवसेनेचे नेते संजय राऊत पोहचले. त्यांनी बंद दाराआड सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. नाशिकमधून शिवसेनेचा खासदार असताना येथे शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील शिवसैनिक संतप्त आहेत. त्यात ही भेट झाल्याने शिवसेनेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना महायुतीची जबाबदारी पार पाडणार की, राष्ट्रवादीला येथे साथ देणार अशी चर्चा या भेटीमुळे सुरु झाली आहे.

Visit : Policenama.com