Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले – ‘शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून MIM ला सुपारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या (BJP) विरोधात असणाऱ्या प्रत्येक पक्षाला बदनाम केले जाते. याच व्यापक कटाचा भाग म्हणून भाजपनेच एमआयएमच्या (MIM) महाराष्ट्रातील (Maharashtra) नेत्याला महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) युतीची ऑफर (Alliance Offer) द्यायला सांगितले, असा आरोप शिवसेना नेते (Shiv Sena leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. शिवसेनेला ‘जनाब सेना’ असे संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा असाही टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

 

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेनेच्या खासदारांना ‘शिवसंपर्क अभियानांतर्गत’ (Shiv Sampark Abhiyan) संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला.

 

संजय राऊत म्हणाले, भाजपकडून एमआयएमला आघाडीच्या ऑफरची सूचना देण्यात आली. एमआयएम ऑफर म्हणजे भाजपचा कट आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी गैरसमज पसरवण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे हिंदुत्व (Shiv Sena Hindutva) बदनाम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे खासदार येत्या काही दिवसांत मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) जनतेशी संपर्क साधणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘शिवसंपर्क अभियानाला’ सुरुवात करण्यात येणार आहे.
एका खासदारांच्या मदतीला 12 पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे.
शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.

 

भाजपने इतिहास तपासून पहावे
आमच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ नाही. आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना प्रथम स्वत:चा इतिहास आणि कर्तबगारी तपासून पहावी.
काश्मीरमध्ये (Kashmir) भाजपने अतिरेकी (Terrorist) आणि फुटीरतावाद्यांशी संबंध असणाऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन केले.
तेव्हादेखील शिवसेनेने काश्मीरमधील हुतात्मे आणि काश्मिरी पंडितांचा (Kashmiri Pandits) मुद्दा उपस्थित करत या युतीला विरोध केला होता.
मात्र, भाजपने मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या पक्षाशी क्रांतिकारी युती केली.
त्यामुळे ‘जनाब सेना’ कोण आहे, हा प्रश्न भाजपने स्वत:लाच विचाराव, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 

Web Title :- Sanjay Raut | mim offer to shivsena and mva for alliance its conspiracy of bjp say shivsena leader sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा