×
Homeताज्या बातम्याMP Sanjay Raut | पुन्हा अटक होणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले

MP Sanjay Raut | पुन्हा अटक होणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणी जुलै 2022 मध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना 30 मार्च 2018 रोजी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल बेळगाव न्यायालयाने समन्स बजावला आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

 

बेळगाव न्यायालयाच्या आदेशानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, बेळगावात बोलावून मला अटक करण्याचे कट कारस्थान रचले गेले आहे. दोन दिवसांपूर्वी याची माहिती मला मिळाली. 2018 सालचे भाषण आता काढत आहेत. त्यात आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक काय होते, हे मला अद्याप कळले नाही. कर्नाटक सरकारने कायद्याचा बडगा दाखवून तुरुंगात डांबले, तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. 2018 साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे. याचा अर्थ असा की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, अशी मला माहिती आहे.
बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात डांबून टाकावे,
अशा प्रकारचे कट कारस्थान सुरू असल्याचे संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीचा भाग तोडून कर्नाटकाला जोडण्याबाबत विधान केले होते.
पण, आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून यावर लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे,
बेळगावात बोलवून हल्ले करणे, असली कारस्थाने ते करत आहेत. पण आम्ही हार मानणार नाही
आणि मागेही फिरणार नाही, असे यावेळी संजय राऊत यांनी नमूद केले.

 

Web Title :- Sanjay Raut | mp sanjay raut reacts to the talk of arrests by the karnataka police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Must Read
Related News