Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दिलासा ! उच्च न्यायालयाची जामिनाविरोधात सुनवाई करण्यास नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुमारे 100 दिवस अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पीएमएलए कोर्टाने जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर त्यांना (Sanjay Raut) पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक करणाऱ्या ‘ईडी’ ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने उच्च न्यायालयात जाऊन जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती.

 

मात्र, या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या आधीही जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तेव्हादेखील उच्च न्यायालयाने याप्रकरणाची तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी जामीन दिला होता. विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना केलेल्या टिप्पणीच्या अनुषंगाने ईडीने त्यांच्या याचिकेत काही बदल केले होते.

 

परंतु, न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास नकार दिला.
त्यामुळे ईडीला आता उच्च न्यायालयातील दुसऱ्या खंडपीठासमोर नवी याचिका दाखल करावी लागले.
परिणामी संजय राऊत यांना आणखी काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
विशेष न्यायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर करताना ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.
मुख्य आरोपी सोडून आणि दिवाणी वादाला मनी लाँड्रिंग प्रकरण बनवून संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक केली असल्याची टीका विशेष न्यायालयाने केली होती.

 

Web Title :- Sanjay Raut | mumbai bombay high court-denied-to-take-hearing on ed plea to cancel sanjay raut bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात