Sanjay Raut | औरंगाबादच्या नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव (Dharashiv) असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केल्याने सहाजिकच त्यास आघाडीतील सर्व पक्षांची संमती असल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासंबंधीत आपली भूमिका अद्याप जाहीरपणे मांडलेली नव्हती. परंतु, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी औरंगाबाद येथे याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाष्य केले आहे.

 

शरद पवार यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत म्हटले की, राज्यात 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन केली. महाआघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा विषय नव्हता. आघाडीच्या शेवटच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाबाबत आमच्याशी कुठलाही संवाद झालेला नव्हता. त्याबाबतची माहिती आम्हाला नव्हती. पवार यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. (Sanjay Raut)

राऊत म्हणाले, शरद पवारांनी इतकेच म्हटले आहे की आमच्यासोबत संवाद साधला नाही. त्यांनी निर्णयाला विरोध केलेला नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन्ही पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते आणि हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

 

औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शहरांची नावे बदलून काहीही होत नाही.
त्याचा काही उपयोग नाही.
त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटची ठरलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
त्याविषयी आम्हाला माहिती नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मंत्रिमंडळाचा आहे, असा मानण्याचा प्रघात आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | NCP Chief sharad pawar is not against renaming aurangabad shivsena leader and mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा