संजय राऊत सुशांतला ‘या’ दिग्गजाचा रोल करणार होते ‘ऑफर’, पण…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या ज्या चार डायर्‍या जप्त केल्या होत्या त्यातून बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यात माध्यमे सोशल मीडिया आणि इतर शक्य तितक्या सगळ्या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याची भूमिका करणार्‍या चेहर्‍यांची शोधाशोध सुरू झाली. त्यात सुशांतच्या नावावरदेखील विचार करण्यात आला असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

सुशांतने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा सहा चित्रपट निर्मात्यांशी त्याचा करार झाला होता. धोनी चित्रपटात त्याने उत्तम काम केले होते.

त्यानंतर त्याच्या नावाची आणखी चर्चा झाली. यावेळी ठाकरे सिनेमाची निर्मिती संपली आणि सुशांत हा त्यांच्या नजरेत होता. तो एक उत्तम अभिनेता असून त्याच्या कामावर सगळ्यांचे प्रेम होते त्यामुळे जॉर्ड फर्नांडिस यांच्या बायोपिकसाठी सुशांतच्या नावाचा विचार करण्यात आला. पण यावेळी दोन दिवसांनी संजय राऊत यांना धक्कादायक माहिती मिळाली होती. सुशांत एक गुणी अभिनेता असला तरी तो सध्या मानसिक तणावाखाली असल्याचं राऊत यांना सांगण्यात आले. त्यामुळे अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणामुळे त्याच्याशी करार मोडला असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. . त्यामुळे सुशांतसारखे सच्चे अभिनेते त्यांच्या कलागुणांमुळे मोठे होतात. प्रगतीची उंच शिखरे गाठतात. पण हिंदी सिनेसृष्टीत काही 4-5 लोकांनी तळ ठोकला आहे, हे सुद्धा खरं आहे. पण त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली हे म्हणणे योग्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले.