Sanjay Raut ON AIMIM Offer | एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut ON AIMIM Offer | राज्यातील राजकारणाची समीकरण बदलण्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी युतीची (Alliance) ऑफर केली आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेला (Shivsena) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut ON AIMIM Offer)

 

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे चौथा आणि पाचवा कोणी असेल याची चर्चा आत्तापासून करण्याची गरज नाही.
जे भाजपसोबत (BJP) छुप्या युतीत काम करत आहेत त्यांचा महाविकास आघाडीशी संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
जे औरंगजेबाला (Aurangzeb) मानतात त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार्‍यांशी काही संबंध येत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut ON AIMIM Offer)

 

एमआयएम (MIM) भाजपची बी टीम आहे, हे आपण सर्व राज्यात पाहिलं आहे.
औरंगजेबाच्या कबरींसमोर झुकणाऱ्यांसोबत आमची आघाडी कशी होईल ?, तुम्ही कसा विचार करू शकता, त्यांना दुरूनच नमस्कार, असं म्हणत राऊतांनी एमआयएमची ऑफर धुडकावली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने युतीच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक अट ठेवली आहे.

दरम्यान, एमआयएमला महाविकास आघाडीसोबत यायचं असेल तर ते भाजपविरोधी आहेत आणि आम्ही भाजपला पराभूत करण्यास उत्सुक आहोत हे कृतीतून दाखवावं लागेल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut ON AIMIM Offer | will mahavikas aghadi accept aimims imtiaz jaleels offer to share power shiv senas sanjay raut reacted with big no

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा