Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”

मुंबई : Sanjay Raut On Amit Shah | अमित शाह इंडिया आघाडीत (INDIA Aghadi) घराणेशाही म्हणत असतील तर त्यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे. जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? की त्यांना बीसीसीआयचे अध्यक्ष केले? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का? अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचे लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचे आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचे कल्याण करायचे आहे, अशी जोरदार टीका भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केली होती. या टीकेला आज राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत म्हणाले, घराणेशाही म्हटले जाते तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे.
या प्रतिष्ठेचा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे. आम्ही स्वार्थाचे राजकारण करत नाही.
शरद पवारांची घराणेशाही आहे का? त्यांनी कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केले आहे त्याचा गौरव तुमच्या सरकारने
केला आहे. घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे.

इंडिया आघाडीबाबत अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, इंडिया आघाडीत जागावाटपासंदर्भात
कोणताही वाद नाही. ओरबडण्याचे आमचे धोरण नाही. मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणही होते.
त्यांची भूमिकाही हीच आहे. आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकून संविधानावरचा हल्ला परतवायचा आहे.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळे एकत्र आहोत.
तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहचली आहे. पण, ज्यांना धनुष्यबाण मिळाला त्या धनुष्याची प्रत्यंचा जागेवर आहे का?
घड्याळ ज्यांना मिळाले ते घड्याळ चालू आहे का? हे बघावे लागेल असे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत