Sanjay Raut | ‘बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | बेळगाव महापालिका निवडणुकीची (Belgaum Municipal Election) रणधुमाळी सुरु आहे. आज (शुक्रवार) 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडत आहे. मात्र, या निवडणुकीला उभा राहीलेल्या उमेदवारांचे भवितव्य 6 सप्टेंबर रोजी कळणार आहे. बेळगावची सत्ता कोणाकडे जाणार, यावरुन आता मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केलीय. या मुद्द्यावरुन आता शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल.
या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.
असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) हे माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे.
या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30 च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल.
तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा.
मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी असल्याचं ते म्हणालेत.

 

पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे.
तसेच, मराठी सत्ता असलेली महापालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली.
भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली.
असा आरोप राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Election) 58 प्रभागांसाठी मतदान होणार आहे.
एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
BJP 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, JDS 11, आप 37, MIMIM 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Web Title : sanjay raut on belgaum municipal corporation said we will win more 30 seats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार’

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

Ajit Pawar | ‘…एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?’, अन् अजित पवार संतापले