Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari | संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाले – ‘105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनी देखील केला नव्हता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari | मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी (Financial Capital Of India) म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केल्याने राज्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे (MNS), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीनंतर (NCP) शिवसेनेने (Shivsena) सुद्धा जोरदार हल्लाबोल करत राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाही लक्ष्य केले आहे. (Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari)

 

या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana), आमदार रवी राणा (Ravi Rana), नितेश राणे (Nitesh Rane), अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा (Remo D’Souza) व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी (Rakesh Kothari) इ. उपस्थित होते.

 

राऊत यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, थोडक्यात काय तर महाराष्ट्र (Maharashtra) व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे… ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय ?. दुसर्‍या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटलेय की, आता तरी ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा (BJP) राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल. (Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari)

 

दुसर्‍या एका ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आणि आता काय हा मराठी माणूस. महाराष्ट्राचा घोर अपमान ! 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.

 

काय म्हणाले होते राज्यपाल ?

मुंबईत एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की,
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.
या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर,
नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी इ. उपस्थित होते.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मनसेने देखील राज्यपालांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

तर सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटले की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे.
गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे.
यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) परंपरेचा स्तर तर खालावला आहे,
शिवाय महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.

 

Web Title : – Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari | shiv sena leader mp sanjay raut targets bhagat singh koshyari his comment mumbai financial hug gujrati rajasthani maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा