मुंबई अन् महाराष्ट्राबद्दल बोलणार्‍यांचं पुढचं पाऊल राजकारणात : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कंगनाच कार्यालय हे बेकायदेशीर होत. तिचे बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून सध्या कांगावा सुरु आहे. कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवाद करण्यात येत हे हास्यास्पद आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र सुरु असल्याचा, आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्यावर त्यांनी भाष्य करत, हे अपेक्षितच होते, असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे निवडणुकीसाठीच राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. ते आता राजकीय पक्षात जातील. हे मला अपेक्षितच होते. जे, महाराष्ट्र, मुंबईबाबत बोलतात त्याचं पुढचे पाऊल राजकारणात, त्यासाठी महाराष्ट्र आणि मुंबईला, पायपुसण म्हणून वापरतात,’ असे त्यांनी सांगितलं. ‘आम्ही बाळासाहेबांच्या हाताखाली घडलो आहोत माझ्यावर १६० खटले आहेत. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयीन लढाई नवीन नाही,’ असे त्यांनी नमूद केलं.

महापालिकेची आकसापोटी कारवाई
कंगना राणौत हिच्या बंगल्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर कंगनाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यानंतर आता तिने संजय राऊत यांना देखील कोर्टात खेचलं आहे. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल विधाने केली. नंतर महापालिकेने दृष्ट हेतूने आणि आकसापोटी बंगल्यावर तोडकामाची कारवाई केली, असा आरोप केल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना देखील या प्रकरणात प्रतिवादी केलं आहे.