Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

मुंबई : Sanjay Raut On BJP | भाजपाने अजित पवार (Ajit Pawar) आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे की तुमचे उमेदवार कमळावर लढतील. धनुष्यबाण, घड्याळ असले तरीही लोक मतदान करणार नाहीत. त्यामुळे कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी दिला आहे, हे जर खोटे असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.(Sanjay Raut On BJP)

संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला अत्यंत चांगले, ऐतिहासिक चिन्ह मिळाले आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचे वातावरण होते.

राऊत पुढे म्हणाले, ज्या दोन गटांनी चिन्ह चोरले त्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढण्याची हिंमत नाही.
भाजपालासुद्धा या फुटलेल्या दोन गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचे धाडस नाही.

या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्ह घेऊन लढेल आणि शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल.
काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल, असे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन