‘माझे नाव राहुल सावरकर नाही’, यावरून संजय राऊतांनी दिला काँग्रेसला ‘गर्भित’ इशारा,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळे केलेल्या विधानाबाबत मी माफी मागणार नाही अशी गर्जना राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केली होती. मात्र आता यावर राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणारी शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे ज्यामध्ये ते म्हणतात आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे अशा प्रकारचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ असा वाक्यप्रयोग केला होता त्यावरून राहुल गांधी यांनी लोकसभेत माफी मागावी अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी केली होती त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आक्रमक होत मी माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावेळी माझे नाव राहुल सावरकर नाही असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.

विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत अशा प्रकारचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

सावरकरांच्या विषयाबाबत शिवसेना नेहमीच आक्रमक राहिलेली आहे त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या आधी अनेकदा सावरकरांचा सन्मान न राखल्यामुळे शिवसेनेने काँग्रेसवर टीका देखील केलेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like