Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर लाभले असते, तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Devendra Fadnavis | राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा, बंडखोरी आणि सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर खडे बोल सुनावले आहेत. राऊत यांनी म्हटले की, कितीही भ्रम निर्माण केला तरी या राज्याची जनता ते स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) आशीर्वाद जर खरोखर तुम्हाला लाभले असते तर आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र तुम्हाला उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागत आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

 

राऊत पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ही आग असून तिच्याशी खेळू नका. ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नुसते हात पोळलेले नाही तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळलेली आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत त्यांचा निर्णय जनता घेईल.

 

संजय राऊत म्हणाले की, या आमदारांविषयी बोलणे आता आम्ही थांबवलेले आहे. कारण आता ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचे आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल, तर तो त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचे नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.

राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीत ढोंगीपणा, खोटेपणाला स्थान नाही, हा इतिहास आहे.
शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केले, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी राहिली.
आजही भाजपाला महाराष्ट्रात स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले
आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसैनिक मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागतात.
यातच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व अधोरेखित होते.

 

Web Title :- Sanjay Raut On Devendra Fadnavis | if you really got the blessings of balasaheb thackeray you would be the chief minister today sanjay raut criticizes devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज जमा करावे अवघे 67 रुपये, 5 वर्षात तुमचे मुल होईल लखपती

 

Shivajirao Adhalrao Patil | शिवसेना अजूनही गोंधळलेली रात्री हकालपट्टी, सकाळी इन्कार ! शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच

 

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, वर्षभरात रू. 90 लाख नफा, 7300% रिटर्न