Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा टोला; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी यात पडू नये, नाहीतर मागे जे सकाळी झालं होतं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Devendra Fadnavis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या बंडाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात भूकंप झाला आहे. सध्या शिवसेनेत दोन गट पडताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे राजकारणात मोठी ठिणगी पडल्याचे चित्र आहे. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बंडखोर आमदारांवर चांगलेच संतापले. शिवसेना पदाधिका-यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवरही टिका केली. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला आहे.

 

माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांच्या बैठकांविषयी विचारणा केली असता संजय राऊत यांनी त्यांना यात न पडण्याचा सल्ला दिला आहे.
त्याचबरोबर, ‘तुमची उरली सुरली प्रतिष्ठा वाचवा,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे. “देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन.
तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ”, असं संजय राऊत म्हणाले.

 

पुढे राऊत म्हणाले, “राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी फार महत्त्वाची असते.
आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक निर्णय होतील. पक्षाच्या भवितव्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा होईल.
काही नव्या नियुक्त्या होतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी मजबुतीनं उभे आहेत.
आजची राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणारी असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut On Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut mocks bjp devendra fadnavis on eknath shinde uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा