Sanjay Raut on Devendra Fadnavis | नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘…तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Devendra Fadnavis | भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरच्या मातीत एक वगळेपण आहे, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) नागपूरला वारंवार आले तर त्यांना सुबुद्धी येईल,’ अशा शब्दात टोला लगावला होता. त्यावर नागपूर दौऱ्यावर (Nagpur News) असलेले संजय राऊत यांनी देखील जाहीर सभेत फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, ”दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि मुख्यमंत्री पद गेले. त्यावेळी जर शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, हिंदुत्त्ववादी पक्ष आहे मित्राच्या नात्याने राहिले पाहिजे अशी सुबुद्धी आली असती तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल देताय.” असा सणसणीत टोलाही फडणवीस यांना लगावला.

 

दरम्यान, सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ”त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झालं आहे, असे वाटत आहे. पण थोडी सुबुद्धी राज्यातील त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र् शांत राहील आम्ही या गोष्टी त्यांना सांगू. असे सांगतानाच आमच्यावर नागपूरकरांचे प्रेम वाढत चालले असल्याचेही” त्यांनी सांगितले.

 

Web Title :-  shivsena mp sanjay raut slams devendra fadnavis in nagpur rally

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा