Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘बाबरी कोणी पाडली? ऐका…’ संजय राऊतांनी दिला फडणवीसांना पुरावा; अडवाणींचा व्हिडिओ केला ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Devendra Fadnavis | भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बुस्टर डोस सभेत बाबरी मशीद पाडण्याचा (Babri Masjid Demolition) मुद्दा काढत, शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. याला शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता बाबरी मशिदीच्या पाडण्यावरुन शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट पुरावा दिला आहे. (Sanjay Raut on Devendra Fadnavis)

 

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरुन जोरदार टीका केली होती. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या 32 जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते असे फडणवीस म्हणाले. तसेच मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. (Sanjay Raut on Devendra Fadnavis)

 

 

काय म्हणाले लालकृष्ण अडवाणी?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लालकृष्ण अडवाणींच्या एका मुलाखतीमधील (Interview) 43 सेकंदाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 29 डिसेंबर 2000 रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये लालकृष्ण अडवाणी सांगतात की, 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मी सर्वात प्रथम उमा भारती (Uma Bharti) यांना पाठवलं होतं. परत आल्यानंतर त्यांनी घुमटावर चढलेले लोक मराठीत बोलत असून ऐकायला तयार नसल्याचं सांगितलं. म्हणून मी प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांना पाठवलं. पण ते देखील हतबल होऊन परत आले. मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना मला जाऊ द्या असं सांगितलं. पण त्यांनी जाऊ दिलं नाही.

 

CBI चा अहवाल तपासा, अज्ञानांना समजेल शिवसेना कोठे होती

सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी (Sundar Singh Bhandari) यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा (CBI) अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा (Central Intelligence Agency) अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल, असे राऊत यांनी फडणवीसांना सुनावलं.

 

Web Title :- Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena sanjay raut tweets bjp leader lk advani video over babari demolition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा