Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Eknath Shinde | खोट्या शिवसेनेच्या अधिवेशनात मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर होतो. भाजपाचे अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात होतो. काय ही लाचारी. जर आज बाळासाहेब ठाकरे आज असते तर यांचा कडेलोट केला असता, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

कोल्हापूर येथील अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात २०१९ च्या निवडणुकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विधान केले होते. या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटले की, शिंदे सेनेत जोर असेल तर त्यांनी मुंबई, ठाण्याच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात. मग जोर कोणाच्यात आहे ते दाखवून देऊ.

राऊत पुढे म्हणाले, मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. तिथे भाजपाचे इतरही नेते होते. मात्र एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजपाचे नोकर झाले आहेत, त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य आहेत.

संजय राऊत म्हणाले, २०१४ साली भाजपाने युती तोडली. पण पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ते स्वबळावर जिंकू शकणार नाहीत, हे कळल्यावर अमित शाह मातोश्रीवर कशासाठी आले? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे.

मोदी-शाह यांच्याबरोबर राहून शिंदेंनाही खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह आणि भाजपाचे इतर नेते हॉटेल ब्लू सी येथे गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचे वाटप ५०-५० टक्के होईल, असे विधान केले. त्यांचे विधान सार्वजनिक आहे, असे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त