Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण सिंह अन् CM योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Kirit Somaiya | पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

मनसेने (MNS) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर या फोटोची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. यावर संजय राऊत (Sanjay Raut on Kirit Somaiya) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना टोला लगावला आहे. “आम्हीपण खासदार आहोत, आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो, तुम्ही जरा अभ्यास करत जा.” असं राऊत म्हणाले.

 

किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस…
“किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. त्याला मानहानीचा खटला दाखल केलाय तर त्याला दुसरं कामंच काय आहे ? कितीचाही खटला दाखल करू द्या आम्हाला काय फरक पडत नाही.” असं राऊत म्हणाले. “ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित विक्रांत घोटाळा केला तो काय मानहानी करणार ? तो आरोपी आहे, जामिनावर सुटलाय तो, तोंडानेच बोलतोय की दुसऱ्या कोणत्या अवयवाने बोलतोय काय माहिती ?” अशी टीका संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.

 

Web Title :- Sanjay Raut on Kirit Somaiya | shivsena leader and mp sanjay raut on raj thackeray mp brijbhushan up cm yogi adityanath bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा