Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर निशाणा; म्हणाले – ‘मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘मी मुंबईचा मराठी माणूस आहे. हे शहर आमच्या बापाचं आहे, तुमच्यासारख्यांचं नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात,’ अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सोमय्यावर निशाणा साधला आहे.

”मी मुंबईचा मराठी माणूस आहे. हे शहर आमच्या बापाचं आहे, तुमच्यासारख्यांचं नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात,’ तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात आलेल्या कंपन्यांकडून सोमय्या कुटुंबाच्या खासगी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देण्यात आले. काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रकार आहे का ? हे सर्व व्यवहार संशयास्पद असून याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यासोबतच आम्ही लवकरच विधान परिषदेतील भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढू, तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवत असताना तुमच्याकडे चार बोटे आहेत. जे लोक स्वत: काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नयेत,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title :- shivsena leader and MP sanjay raut slams kirit somaiya and his family over scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा