Sanjay Raut on MP Navneet Rana | खा. नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on MP Navneet Rana | राज्यात हनुमान चालीसा पठण वरुन राज्यात वादंग निर्माण झाला आहे. यावरुनच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना अटक Sanjay Raut on MP Navneet Rana | राज्यात हनुमान चालीसा पठण वरुन राज्यात वादंग निर्माण झाला आहे. यावरुनच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) केलेल्या आरोपानंतर नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. कारण मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी नवनीत राणा पोलिस ठाण्यात चहा-पाणी घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याच्यांकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे आता नवनीत राणा आणखी अडचणीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावाला याचे दाऊदच्या डी कंपनीशी (D Company) संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या याच युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. याबाबत नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात देखील माहिती दिली होती. त्याचेच कागदपत्रे राऊतांनी ट्विट केले आहे.

 

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखा (Mumbai EoW) नवनीत राणा यांच्या या व्यवहाराची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणामध्ये चौकशी करणार की नाही यासंदर्भात अजुन माहिती समोर आली नाही. दरम्यान, युसुफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली ईडीने (ED) अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग म्हणजेच अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग, या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का ? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का ? याबाबत प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :  mp navneet rana may be in trouble as mva government can order inquiry about allegation of loan from yusuf lakdawala

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI