Sanjay Raut on Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘शिवसेनेला धमकीची शेकडो पत्र रोज येतात, स्टंटबाजी सोडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Raj Thackeray | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना धमकीचे पत्र आलं आहे. यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘धमकीची अशी शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला,’ असा टोला राऊत यांनी लगावला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की “महाराष्ट्रात ठाकरे सरकार (Thackeray Government) आहे त्यामुळे इथं कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. अशा धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) असताना कुणाची काय हिंमत कुणाला हात लावायची. इथलं गृहखातं सक्षम असून प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे स्टंटबाजी सोडा महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित आहे.”

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांच्या कार्यालयात एक धमकीचं पत्र आलं आहे. यात बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेऊन संबंधित पत्र त्यांच्या सुपूर्द केलं होतं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना पत्राबाबत माहिती दिली होती.

Web Title : Sanjay Raut on Raj Thackeray | hundreds of threatening letters come to shiv sena
every day stop stunting says sanjay raut on raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन