×
Homeताज्या बातम्याSanjay Ruat On Raj Thackeray | नकला करणे पुरे करा आणि प्रगल्भ...

Sanjay Ruat On Raj Thackeray | नकला करणे पुरे करा आणि प्रगल्भ राजकारण करा; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Ruat On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाच्या गटाध्यक्षांचा रविवारी मुंबईत मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारण म्हणजे नकला करणे नाही. लोकांचे आवाज काढणे खूप झाले. आता थोडे मोठे व्हा आणि संघटनात्मक काम करा, असे संजय राऊत राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले आहेत. (Sanjay Ruat On Raj Thackeray)

 

राज ठाकरे यांनी कालच्या सभेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची नक्कल केली. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लावला आहे. राजकारण म्हणजे नकला करणे नाही. आम्हाला नकला पाहायच्या असतील, तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. राजकारणात अजून किती दिवस आवाज काढत बसणार आहात? आता तरी मोठे व्हा, आणि प्रगल्भ राजकारण करा. आवाज काढणे आता खूप झाले. याच्या पलीकडे देखील खूप काही आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करून किती दिवस काढणार आहात. जरा विधायक गोष्टी करा.
आता आमच्यावर एवढी संकटे आली आहेत. तरी देखील आम्ही मैदानात उभे आहोत, लढत आहोत.
जे टीका करत आहेत, त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती, असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला. (Sanjay Ruat On Raj Thackeray)

यावेळी संजय राऊत यांनी भाजपचा देखील समाचार घेतला.
भाजपचे टगे आता महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत.
त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान होत असताना, भाजप आणि शिंदे गट हात चोळत बसले आहेत.
देशातील कोणत्याही मोठ्या नेत्याचा अपमान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे, असे यावेळी राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut On Raj Thackeray | sanjay raut says enough of making mimicry now be mature to raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Pune NCP | रामदेव बाबांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत

Must Read
Related News