Sanjay Raut on Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत…’

मुंबई : पोलीसनामान ऑनलाइन – Sanjay Raut on Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं समजते. मात्र स्थानिक भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी राज यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे. ‘माफी मागेपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नसल्याचा,’ इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut on Raj Thackeray)

 

संजय राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशच्या जनतेच्या काही भावना असतील आणि त्यांचा उद्रेक एखादा नेता करत असेल, तर त्यांच्याशी आम्हाला संवाद साधावा लागेल. बृजभूषण लढवय्ये आहेत. त्यांचे-आमचे संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतो. तो माणूस मागे हटणारा नाही,” असं ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? ते मला माहिती नाही.
उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांच्या विरुद्ध त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काही भूमिका घेतली होती.
पण एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले. त्यामुळे तिकडच्या काही लोकांनी यावर लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले असतील.”

 

दरम्यान, ”राज ठाकरेंना अयोध्येला जाऊ द्या. ते तिथेच ठाण मांडून बसले, तिथे एखादं घर घेतलं,
आश्रम बांधला हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं आजचं नाहीये. राजकीय नाही.
आम्ही तिथे सतत जात-येत असतो. आंदोलनापासून आमचा तिथे संबंध असल्याचं,” संजय राऊत यांनी सांगितलं.

 

Web Title :- Sanjay Raut on Raj Thackeray | Shivsena leader and mp sanjay raut slams raj thackeray on hindutva ayodhya visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

 

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

 

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती