Sanjay Raut On Raosaheb Danve | ‘केंद्रीय मंत्री असल्याने माहिती त्यांच्यापर्यंत गेली असावी’; संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना टोला

पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut On Raosaheb Danve | साधारणपणे चार महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय धुमाकुळीनंतर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केला आणि स्वतःच्या बरोबर ४० आमदार आणि १२ खासदार घेत भाजपबरोबर युती केली. तेव्हापासूनच उर्वरित उद्धव ठाकरे गटाकडून सरकार अस्थिर असल्याची चर्चा आणि विधाने सातत्याने होत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा त्याचा पुनः उच्चार केला आहे. (Sanjay Raut On Raosaheb Danve)

मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करत होते तेव्हा त्यांनी, महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण होत आहे, त्यामुळे पुढच्या दोन महिन्यात काय ते सांगता येत नाही, असे विधान केले होते. ते एकनाथ शिंदेंच्या शपथ विधी बद्दल बोलत होते. त्याचा आधार घेत आता संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On Raosaheb Danve)

ते म्हणाले की, ‘शिंदे फडणवीस सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत.
कालच रावसाहेब दानवे यांनी विधान केलं, दोन महिन्यांमध्ये काय होईल सांगता येत नाही.
याचा अर्थ त्यांनाही आमच्या हालचालींची बित्तंबातमी मिळाली असेल.
पुढच्या दोन महिन्यांत हे सरकार राहील की जाईल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे.
याचा अर्थ असा आहे की, भूगर्भात काय हालचाली सुरू आहेत.
पडद्यामागे काय चालू आहे, याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्यापर्यंत गेली असावी,’
असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Web Title :- Sanjay Raut On Raosaheb Danve | shinde government will go in the state strong underground movement sanjay rauts indicative statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Sandeep Khardekar | सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर