Sanjay Raut On Sharad Pawar NCP | शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त ! ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, स्ट्राइकरेट जास्त, पण..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut On Sharad Pawar NCP | विधानसभा आणि संसदेचे आधिवेश झाल्यानंतर आम्ही पुन्हा बसू आणि चर्चा करू. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे. यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त आहे. पवारांनी १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या. याचा अर्थ असा नाही… शिवसेनेने ९ जागा जिंकल्या, शिवसेनेला सर्वात जास्त टार्गेट करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत दिली आहे. शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊत बोलत होते. (Maharashtra Assembly Elections 2024)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते. पुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जगपात यांनी वरील भाष्य केले होते. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. ना एनसीपी सोबत ना काँग्रेससोबत. त्यामुळे कोण किती जागा लढणार हा प्रश्नच येत नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढून, एकतेची ताकद काय असते, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.

(Sanjay Raut) संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशने मोंदींचे बहुमत रोखले. आमची बोलणी लवकरच सुरू होईल. आम्ही २५ तारखेलाच चर्चेसाठी बसणार होतो. मात्र, काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्वच नेते दिल्लीला जाणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची २५ तारखेला होणारी बैठक आम्ही पुढे ढकलली आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही २१ जागा लढवल्या. त्यांपैकी ९ जिंकल्या. मुंबईच्या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटाने डाका टाकला. ती जागाही आम्ही जिंकलो होतो. दोन तीन जागा अशा आहेत जेथे आम्ही फार कमी फरकाने हारलो. त्यामुळे आमचाही स्ट्राइकरेट चांगला आहे. काँग्रेसचाही चांगला आहे. महाराष्ट्रात २८८ जागा आहेत, कुणाला काहीही कमी पडणार नाही. सर्वजण आरामात लढतील, असे राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dengue Outbreak In Pune | पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू बाधितांच्या आकड्यात वाढ; महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

JM Road Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनिकल पार्किंगमध्ये शिरले चोर, पकडण्यासाठी पोलिसांचा थरार, पण…

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून राणेंना पक्षातून काढले, नवरा-बायको बॅग घेऊन बाहेर पडले, रामदास कदमांचे ठाकरेंवर आरोप

Pune RTO | नोंदणी न करताच वाहनविक्री केल्याने वाहनविक्री परवाना रद्द; आरटीओ कडून विक्रेत्यांवर होणार कारवाई

PMC Property Tax | मिळकत कर विभागाच्या सर्वेक्षण मोहीमेसाठी अतिरिक्त 375 कर्मचारी उपलब्ध; 40 टक्के कर सवलत देण्यासाठी महापालिका प्रशासनाची विशेष मोहीम

Vadgaon Sheri Pune Crime News | शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांची तोडफोड (Video)