Sanjay Raut On Shivsena Dasara Melava | “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…” दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी

पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut On Shivsena Dasara Melava | राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde Group) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यंदाचा दसरा मेळावा (Dussehra Melava) शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा करण्यात येत आहे. या सगळ्या वादात आता आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या ताब्यात असेलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. (Sanjay Raut On Shivsena Dasara Melava)

यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मैदान उपलब्ध व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्क (Shivaji Park, Mumbai) मैदानावर मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी हेच मैदान मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडीच्या ताब्यात असेलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कामध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला संजय राऊत यांनी शिवसेना नेत्यांना दिला. एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे.

एमएमआरडीकडून शिंदे गटाला परवानगी

बीकेसीमधील मैदानावर (BKC Ground) मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीकडून परवानगी देण्यात आली आहे.
मात्र मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही.

Web Title :- Sanjay Raut On Shivsena Dasara Melava |dasara melava shivsena vs eknath shinde sanjay raut reacts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Manoj Karjagi | मिठी मारत चुंबन घेण्याचा केला प्रयत्न, ‘या’ काँग्रेस नेत्यावर महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक शोषणाचा आरोप

Pune Crime | पैसे परत करण्याचा तगादा लावणार्‍या 7 जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील 4 सावकारांना अटक

Devendra Fadnavis | हा शिंदे गट नाही ही शिवसेना, तिकडे शिल्लक सेना; फडणवीसांनी लगावला टोला