Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आय टी विभागाने (IT Department) छापा मारला होता. या धाडीमध्ये जाधवांची काही व्यवहाराची कागदपत्रे सापडली असल्याचं बोललं जात होतं. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाधवांची एक डायरी (Diary) सापडली होती. त्यामध्ये त्यांनी ‘मातोश्री’ला (Matoshree) 2 कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिल्याच्या उल्लेखाची काही वृत्त प्रसारित झाली. मात्र त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary)

मातोश्री म्हणजे आई असू शकत नाही का ?, आपल्या महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची मोठी परंपरा आहे. मी यशवंत जाधव यांनी दिलेलं स्पष्टीकरण पाहिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आईला दानधर्मासाठी काही पैसे दिले होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी आय टी विभागाला मिळालेल्या डायरीवरही शंका घेतली आहे.

शिवसेनेमध्ये (Shivsena) डायरी लिहिण्याची पद्धत नाही, खोटे पुरावे आणि गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा या डायऱ्या विश्वासपात्र नसतात. डायरीमध्ये भाजप नेत्यांची नावं आली होतीत तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितलं होतं की, डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊतांनी आवर्जुन सांगितलं.

दरम्यान, यशवंत जाधव यांनीसुद्धा 2 कोटी 50 लाखांंचं घड्याळ हे आपल्या आईला दिलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

web title : Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | Shivsena leader mention of matoshree in yashwant jadhavs diary sanjay rauts big statement said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा