Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, कर्नाटक सीमाप्रश्न, भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधाने, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकातील हल्ले, महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाणे आदी मुद्यांच्या विरोधात आपला आवाज उठवण्यासाठी विरोधक राज्य सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. त्यातून येत्या 17 डिसेंबरला महाविकास आघाडीने मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याला राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. 17 तारखेला महामोर्चा निघणारच, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

आज 15 तारीख आहे. मोर्चाला दोन दिवस शिल्लक आहेत. तरी देखील राज्य सरकारने परवानगी दिली नाही. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकुमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची सुरू असलेली भारत जोडो यात्रा हा एकप्रकारे मोर्चाच आहे. त्यामुळे आमच्या 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकत नाही, असा इशाराच राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलले जात आहे. भाजपचे लोक या गोष्टी करत आहेत. ही फार गंभीर बाब आहे.
घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा फुले या आमच्या दैवतांवर आक्षेपार्ह बोलत असेल आणि सरकारचे त्याला समर्थन असेल,
तर ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. या विरोधात आमचा मोर्चा आहे.
तो आम्ही काढू नये का? आम्ही मोर्चा काढू नये, असे जर सरकारला वाटत असेल,
तर त्यांनी राज्यपालांना पदावरून हटवले पाहिजे.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावर कारवाई झाली पाहिजे.
त्यांनी ती केली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आमचा मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | opposition mahamorcha sanjay raut on the 17th the mahamorcha will start no- one will be able to stop it sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा

Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन