Sanjay Raut | संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले – ‘आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election 2022) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (Shiv Sena leader) आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या आमदारांचा (MLA) खून होऊ शकतो. अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केल्या असून अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाल्याचा दावा करत त्यांना मारहाण केल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहेत. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघेंसोबत (Anand Dighe) त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल. आम्ही त्यांना विनंती केली की मुंबईत या आणि चर्चा करा. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांना सुरतमध्ये नेले आहे. अशा नऊ आमदारांना सुरतमध्ये नेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. हे असंच सुरु राहिलं तर मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कठोर अ‍ॅक्शन घ्यावी लागले, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, सुरत येथे भाजपा (BJP) नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
काही वेळाने याठिकाणी अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील पोहचणार आहेत.
त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
शिंदे यांच्याजागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांना जबाबदारी देण्यात आली.
मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा (Resignation) देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title :-  Sanjay Raut | our mlas can be murdered complaints made by many mlas wife sanjay rauts sensational reveal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा