Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | अनिल परबांच्या कारवाईनंतर शिवसेनेचा इशारा; संजय राऊत म्हणाले – ‘आम्ही देखील पाहून घेऊ…’

0
196
Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab Shivsena leader and MP sanjay raut speaks over ed raids on maharashtra minister anil parab
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. परब यांच्यावर झालेल्या कारवाईवरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे.

 

”अनिल परब आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपाच्या (BJP) लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्वजण पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असं संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “तुम्ही सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही.
सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण मागील 55 वर्षात कधी मिळालं नाही,” अशी टीका त्यांनी केलीय.

 

दरम्यान, “महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कारवाया फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी आहेत.
फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा, बदनाम करायचं,
महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे.
पण याचा आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
तर, “तुमच्या हातात केंद्रीय यंत्रणा असल्याने म्हणून राज्यातील राजकीय विरोधकांना नामोहरम करावं असं कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही.
उलट अशा प्रत्येक कारवाईमुळे मनोबल वाढत जाईल,”असंही ते म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | Shivsena leader and MP sanjay raut speaks over ed raids on maharashtra minister anil parab

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा