Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राहुल गांधींच्या टिपणीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) फूट पडू शकते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यानंतर काल राहुल गांधींची (Rahul Gandhi) यात्रा मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) जाण्याआधी त्यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) आणि त्यांच्यात कोणताही गैरसमज राहू नये, यासाठी संजय राऊतांना (Sanjay Raut) फोन करून बोलल्याचे कळते. संजय राऊत यांनी ट्विट करून राहुल गांधींशी झालेल्या बोलण्याबद्दल माहिती दिली.

ते ट्विट (Twitter) मध्ये लिहितात,”भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय..” ट्विटमध्ये जरी राऊतांनी (Sanjay Raut) फक्त त्यांच्या अटकेबद्दल चर्चा झाली, असे म्हणले असले तरी राहुल गांधींच्या सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) विधानानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहता, त्यावरही चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने कालच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश केला.
दरम्यान महाराष्ट्रात असताना या यात्रेने सर्वांचे विविध कारणावरून लक्ष वेधले होते.
विशेष करून राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिपणी नंतर महाविकास आघाडीला तडा जायची शक्यता निर्माण झाली होती.

Web Title :- Sanjay Raut | rahul gandhi called sanjay raut and inquired about his health