CBI कुठंय ? NCB च्या तपासावर संजय राऊतांचं प्रश्नचिन्ह !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)नं या तपासात एन्ट्री घेतली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. यात आता दीपिका पादुकोणसह अनेक बड्या कलाकारांची नावं समोर येताना दिसत आहेत. असं असतानाच आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “एनसीबी ही राष्ट्रीय तपास संस्था आहे. या संस्थेचं काम राष्ट्रीय पातळीवर चालतं. परदेशातून आपल्या देशात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो. हे ड्रग्ज रॅकेट उध्वस्त करायचे, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करायचा हे खरंतर एनसीबीचं काम आहे. मात्र एनसीबीच्या कार्यालयात एकेकाला बोलवून चौकशी करण्याचं काम सध्या सुरू आहे. हे काम करण्यासाठी प्रत्येक शहर आणि राज्यात पोलीस दलात एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आलेला असतानाही एनसीबी स्वत:हून स्थानिक पातळीवर तपास करत आहे. त्याला आमची हरकत नसून सुशांत प्रकरणी सीबीआयच्या तपासाचं काय झालं ते सांगा ?” असा खरमरीत सवाल राऊतांनी केला आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र सीबीआयच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळं नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. हे सगळं करत असतानाच सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचला हेसुध्दा कळलं पाहिजे अंसही राऊत म्हणाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like