संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले – ‘भाजपानं ते पत्र आणि शिवसेनेनं फसवलं यामधून बाहेर पडावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने (BJP) विश्वासघात केल्याचे आम्हालाही वाईट वाटतं. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपने सुद्धा पत्र, शिवसेनेने फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे. एक विरोधी पक्ष (Opposition) म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut)  यांनी लगावला आहे.

Gold Price Today : गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी, किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

54 आमदारांच्या (MLA) सहीचे पत्र (Letter) अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ड्रॉवरमधून चोरले, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) संपादकीयमधून (Editorial) उत्तर दिलं आहे.

ती वेदना आजही टोचत आहे
भाजप नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना राऊत (sanjay raut) म्हणाले, आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतं.
उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता,
असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे.
ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे.
त्यामुळे भाजपने सुद्धा पत्र, शिवसेनेने फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे.
एक विरोधी पक्ष (Opposition) म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे.

चोरीचा माल विकत घेणे गुन्हा
चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा (Crime) आहे.
एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

PM मोदींच्या बैठकीत तोडगा निघेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत चर्चा रंगत असताना संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली.
मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत.
यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
तसेच मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ वेळ दिली.
या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत