Sanjay Raut | संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट किरीट सोमय्या यांनाच पत्र लिहिले आहे. या पत्रातून संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या (Smart City in Pimpri Chinchwad) नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार (Rs 500 Crore Scam) झाल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केला आहे.

 

संजय राऊत यांनी ट्विट करुन दोन पत्रच सोमय्यांना लिहिली आहेत. याप्रकरणी ईडी (ED) आणि सीबीआयकडून (CBI) चौकशी करावी अशी मगणीच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या यांच्याकडे केली आहे.

 

काय म्हटले पत्रात?

संजय राऊत यांनी सोमय्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही दररोज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या (corruption) प्रकरणावर आरोप करत असतात. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता. त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लि. (Crystal Integrated Services Limited) या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

 

या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले पण त्यांनी 50 टक्के देखील कामे केली नाहीत.
त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा हा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा फायदा झाला आहे.
त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीसाठी मागणी करावी, अशी मागणी राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.

 

या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्रे हे तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी तुम्ही नेहमीप्रमाणे ईडीकडे चौकशीसाठी मागणी करुन एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल,
अशी अपेक्षा संजय राऊत यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | reveal the rs 500 crore scam of company shivsena mp sanjay raut wrote a letter directly to bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Latur | 2500 रुपयाची लाच घेताना वीजमंडळाचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; लातूरच्या उदगीर तालुक्यात कारवाई

Gold Silver Update | धनत्रयोदशीपूर्वी 49 हजार रुपयांच्या जवळपास पोहचू शकते सोने, जाणून घ्या काय आहे सर्वात मोठे कारण

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या