Sanjay Raut | महागाईच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती सिलेंडरच्या किंमतीत आज 50 रुपयांची वाढ (Domestic Cylinder Price Hike) झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे तर इंधन दरात सातत्याने वाढ होतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार (Shivsena Leader MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर (BJP) टीकेची झोड उठवली तसेच मनसेच्या (MNS) भोंग्यांच्या भूमिकेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भोंग्याचा (Loudspeaker) विषय आता संपला आहे. देशात महागाई (Inflation) वाढत असून भाजपचा एकही नेता त्यावर का बोलत नाही. असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आता भोंग्याचा विषय संपला आहे. महाराष्ट्र (Maharashtra) शांत असून काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जनतेनं उत्तर दिलं आहे. हा लाऊडस्पीकरचा मुद्दा नव्हता तर हिंदू (Hindu) मुस्लिम (Muslim) तणाव निर्माण करण्याचा होता. पण तो मुद्दा उठलाच नाही. न्यायालयाच्या (Court) निर्णयानुसार काम होत आहे. यासंदर्भात जर काय करायचं असले तर राष्ट्रीय धोरण (National Policy) आणा. इथं जाती आणि धर्माचा विषय येत नाही. भोंगा आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसला आहे. भजन कीर्तन करणाऱ्यांना बसला. हिंदूंमध्ये गट तयार करण्याचा प्रयत्न होता पण तो यशस्वी होऊ शकला नाही. इथली जनता सुजाण आहे.

रशिया – युक्रेन सोडा महागाईवर बोला
देशात महागाई वाढत आहे. पण त्यावर कोणीही बोलायला तयार नाही.
केंद्रातील एकही नेता त्यावर बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची (Russia-Ukraine War) चिंता आहे.
देशातील जनतेच महागाईशी युद्ध सुरू आहे पण इंधन दरवाढ (Fuel Price Increase), सिलेंडर दरवाढ यावर भाजप बोलतय का ? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.
युक्रेन आणि रशिया हे दोघे त्यांचं ते पाहून घेतील. भोंग्यांवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut attack on bjp mns over loudspeaker and inflation issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा