Sanjay Raut | “प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे…” संजय राऊतांना आली प्रचिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. त्यांना पत्राचाळ (Patra Chawl) गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यांना पीएमएलए (PMLA) या विशेष कोर्टाने जामीन दिला. त्याआधी ते तीन महिने तुरुंगात होते. दरम्यान त्यांनी (Sanjay Raut) तुरुंगात घालवलेल्या वेळेबद्दल भाष्य केले आहे.

 

ते म्हणाले, “कोणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये. तुरुंगातील दिवस फार कठीण असतात. पण मला जामीन मिळाला म्हणजे हा लढा संपलेला नाही. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते”. काही लोकं दोन वर्ष झाली तुरुंगात आहेत, अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेली दीड वर्ष तुरुंगात आहेत, त्यात त्यांचा काही दोष नाही सरकारने बनवलेल्या कायद्यांमुळे ते तुरुंगात आहेत, असे कायदे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा भारतात नव्हते. या कायद्यांच्या गैरवापरामुळे अनेक लोक तुरुंगात आहेत. अनेक चांगले उद्योगपती तुरुंगात आहेत. ज्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे, ते लोकदेखील तुरूगांत आहेत, असेही ते म्हणाले.

 

राऊत (Sanjay raut) पुढे म्हणाले, “तुरुंगातील एक-एक तास शंभर दिवसांचा असतो.
तुम्ही कितीही मोठे असले तरी तुरुंगात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.
वीर सावरकर (Swatantyavir Sarvarkar) दहा-दहा वर्षे अंदमानला कसे राहिले असतील.
मंडालेमध्ये लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) कसे राहिले असतील.
आणीबाणीच्या काळात अनेक नेते अडीच-अडीच महिने तुरुंगात होते. हे सगळे लोक तुरुंगात कसे राहिले असतील,
याचा मी विचार करतो. तुरुंगात जाण्याची कोणावरही वेळ येऊ नये. प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे,” असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut comment on prison days said prison days are difficult

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना