Sanjay Raut | शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांनी केली पुनरावृत्ती; म्हणाले – ‘गद्दारांना जनता…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपबरोबर सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी शिंदे गटात बंड होण्याची विधाने करत असतात. त्यातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जामिनावर सुटून आल्यापासून सारखेच शिंदे गटात काहीतरी होईल असा रेटा लावला आहे. त्यांनी आज पुन्हा या विधानाची पुनरावृत्ती केली आहे. शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

संजय राऊत (Sanjay Raut) कालपासून (१ डिसेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तिथे पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. त्यांचे काही आमदार त्यांना सोडून गेले असले तरी त्यांना त्याचा विशेष फरक पडलेला नाही असे सांगत संजय राऊत म्हणाले, “काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होत नाही. ४० नेते गेले तरी पक्ष जमिनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. मग ती महानगरपालिका असेल किंवा अन्य कोणती निवडणूक असेल. आम्ही निवडून येऊ, या भीतीपोटी निवडणुका टाळल्या जात आहेत.” शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले. तेव्हा संजय राऊत म्हणाले, “मी आज खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर होतो. पत्रकारिता हा माझा पिंड आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला नीट कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे गोंदले होते,
त्याप्रकारे उद्या ह्यांच्या मुलांना आणि नातेवाइकांना लोकं गद्दारांची नातेवाईक म्हणतील,
अशी खोचक टीका त्यांनी शिवसेनेला सोडून गेलेल्या आमदार-खासदारांवर केली.
या आमदारांच्या कपाळावर गद्दार हे शब्द कोरले आहेत.
त्यांच्या पिढ्यान् पिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut criticized shinde government in nashik press conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत