Sanjay Raut | सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुहृदयसम्राट शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) द्या, अशी मागणी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.

बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचे बळ दिले आहे. ते हिमालयापेक्षाही मोठे नेते होते. देशात पुन्हा दुसरे बाळासाहेब निर्माण होणार नाहीत. त्यांनी आपल्या परखड विचारांनी आणि भूमिकांनी राज्याला आणि देशाला दिशा दिली. आता राज्यात बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झाले आहेत. ते भंपक आहेत आणि फार काळ टिकणार नाहीत. वीर सावरकरांना भारतरत्न द्या, अशी आमची आग्रही भूमिका होती. त्यांना अजून भारतरत्न का जाहीर झाला नाही, त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न द्यावा, अशी देखील आम्ही मागणी करत आहोत. आज राज्यातील राजकारण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आज बाळासाहेब ह्यात असते, तर त्यांनी हे राजकारण कदापीही खपवून घेतले नसते. त्यांची अवस्था फार वाईट करुन सोडली असती. तसेच पक्षाशी गद्दारी केलेले लोक फार काळ राज्याच्या राजकारणात टिकणार नाहीत. सगळे उघडे पडतील, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला.
सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षे सुरु आहे.
परंतु तसे अद्याप झाले नाही. काँग्रेस सावरकरांना भारतरत्न देण्याच्या विरोधात आहे.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut demand to give bharat ratna to balasaheb thackeray along with savarkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | …तर बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल (व्हिडिओ)

Ganga Maha Aarti | गंगेनंतर आता नाशिकच्या दक्षिण गंगेची ही महाआरती, झाला ‘एवढा’ निधी मंजूर