Sanjay Raut | 103 चा बदला 103; संजय राऊत यांचा अनोखा प्रण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १०३ दिवसानंतर जामिनावर सुटून आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनोखी शपत घेतली आहे. राऊत जितके दिवस कारावासात होते तितकेच आमदार पुढच्या विधानसभेला निवडून आणण्याचा निर्धार संजय राऊत यांनी शिवसैनिकांसमोर ठेवला. शिवाय गद्दारांना बाळासाहेबांच नाव घेण्याचा अधिकार नाही, या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीच शिवसेना (Shivsena) राहिल, असेही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

“मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल. मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे १०३ आमदार निवडून आणणार. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं (Balasaheb Thackeray) नाव घ्यायचा अधिकार नाही. लोकांनी माझं १०३ दिवसांनाही स्मरण ठेवलं, त्यांनी जल्लोष केला. हे माझं स्वागत नसून शिवसेनेचं स्वागत आहे. यापुढे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा पक्षासाठी देणार. आता रडायचं नाही तर लढायचं.” तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतांचा (Sanjay Raut) जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर
आज मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही.
त्यामुळे या याचिकेवर आता उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा, अशी याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut ed hearing on sanjay raut s bail plea adjourned due to lack of time hearing to be held tomorrow patra chawl land scam case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Atul Bhatkhalkar | संजय राऊतांच्या कटुता संपवण्याच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांचा टोला म्हणाले -‘फक्त याची सुरुवात त्यांनी…’

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”